

Bonus of Rs 117 crore to 5 lakh farmers by Gokul right in Diwali
Sakal
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) एकीकडे अध्यक्षपदावरून समविचारी आघाडी आणि महायुतीच्या बड्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना, दुसरीकडे मात्र गोकुळने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना ऐन दिवाळीच्या सणात अत्यंत सुखद धक्का दिला आहे. सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याची परंपरा कायम राखत, गोकुळ संघाने दूध उत्पादकांना आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील अंतिम दूध दर फरकापोटी तब्बल ११७ कोटी ४२ लाख रुपयांची भरघोस रक्कम थेट बँक खात्यांवर वर्ग केली आहे.