Kolhpur Gokul : ‘गोकुळ’कडून संस्थांची यादी ‘दुग्ध’कडे; जूनमध्ये होणार मतदान
Milk Union : गोकुळ दूध संघ निवडणुकीची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. ५,४७० सभासद दूध संस्थांची प्रारूप यादी सहाय्यक निबंधक (दुग्ध) कार्यालयात जमा करण्यात आली असून, छाननीनंतर मतदानासाठी पात्र संस्थांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) त्यांच्याकडील सभासद दूध संस्थांच्या प्रारूप याद्या आज सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्या कार्यालयात जमा केल्या. पाच हजार ४७० संस्था सभासद असून, सर्वाधिक संस्था करवीरमध्ये आहेत.