esakal | Gokul Update Live:गोकुळ दूध संघ व्यापाराच्या हातातून शेतकऱ्याच्या हातात येईल; सतेज पाटीलांचा विश्वास

बोलून बातमी शोधा

null

VIDEO: Gokul Update Live: गोकुळ दूध संघ व्यापाराच्या हातातून शेतकऱ्यांच्या हातात येईल; सतेज पाटीलांचा विश्वास

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोल्हापूर : गोकुळ दूध उत्पादकाच्या ताब्यात जावा यासाठी उत्साहाने शाहू शेतकरी आघाडीला 2280 मतदाराने आमच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. गोकुळ दूध संघ एका व्यापाराच्या हातून जाऊन एका शेतकऱ्याच्या हातात येईल असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीला अनेक वेळा अडथळे आले. अखेर हे सर्व अडथळे पार करत आज मतदानाला सुरुवात झाली. सत्ताधारी आणि विरोधी पॅनल यापूर्वीच मोठी व्युहरचना केली होती.

निवडणुकीसाठी सकाळपासूनच चुरशीचे मतदान सुरू आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक उमेदवार मतदान केंद्राबाहेर पिवळी टोपी, गळ्यात पिवळा स्कार्फ तर काहींच्या डोक्यावर फरची टोपी असा चेहरा असा पेहराव आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर पिवळी टोपी विरुद्ध फरची टोपी असा सामना दिसत आहे.

हेही वाचा- गोकुळ मतदानास चुरशीने प्रारंभ; मतदान केंद्राबाहेर उमेदवार, कार्यकर्ते हजर

विशेष म्हणजे मास्कचा वापर की अशाच रंगीत पद्धतीने करण्यात आला आहे. त्यामुळे मास्क लावल्यानंतर नेमका मतदार कोणाचा हेही यावरून स्पष्ट होत होते. मतदान केंद्रावर दोन्ही पॅनल कडून आपापले मतदार आणण्यात येत होते.

Edited By- Archana Banage