
सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले. सकाळी दर वाढले तर रात्री घटले.
esakal
Gold Rate In India : लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या दिवशी आज, सकाळी दहाच्या सुमारास सोन्याचा दर वाढला आणि तो प्रतितोळा एक लाख ३४ हजार ५०० रुपयांवर पोहोचला. मात्र, रात्री नऊच्या दरम्यान त्यामध्ये घट झाली आणि दर एक लाख २७ हजार ६३३ रुपयांवर येऊन थांबला. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उद्या, बुधवारी दर काय राहणार याकडे सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.