Mahalakshmi Temple : महालक्ष्मी मंदिरात चोरी; देवीचे सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविले

बाळेकुंद्री खुर्द येथील महालक्ष्मी देवी मंदिरात (Mahalakshmi Devi Temple) चोरीची घटना घडली आहे.
Mahalakshmi Devi Temple
Mahalakshmi Devi Templeesakal
Summary

मंदिर समितीच्या (Temple Committee) जागरुकतेमुळे देवीच्या दानपेटीतील रकमेसह सुमारे २५ तोळे सोने चोरट्यांच्या हाती लागले नाही.

बेळगाव : बाळेकुंद्री खुर्द (Balekundri Khurd) येथील महालक्ष्मी देवी मंदिरात (Mahalakshmi Devi Temple) चोरीची घटना घडली आहे. काल सकाळी हा प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी अर्धा तोळे सोने (Gold) आणि ३५ ग्रॅम चांदीचे दागिने लांबविले.

मंदिर समितीच्या (Temple Committee) जागरुकतेमुळे देवीच्या दानपेटीतील रकमेसह सुमारे २५ तोळे सोने चोरट्यांच्या हाती लागले नाही. माहितीनुसार, मंगळवारी (ता. २) मध्यरात्री ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. बाळेकुंद्री खुर्द येथील महालक्ष्मी मंदिराच्या नूतन वास्तूचे काम हाती घेतले असून, याच्या शेजारीच देवीची मूर्ती ठेवण्यासाठी तात्पुरते पत्र्याचे शेड उभारले आहे.

Mahalakshmi Devi Temple
पुरोगामी कोल्हापुरात हे काय घडतंय? गुप्तधनासाठी घरात खड्डा खणून अघोरी विधी; केळीच्या पानावर हळद-कुंकू, टाचण्या मारलेले लिंबू अन्..

चोरट्यांनी प्रथम कन्नड शाळेच्या (Kannada School) बाजूने येऊन शेडचा पत्रा काढून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात यश न आल्याने समोरून कुलूप तोडून प्रवेश केलेल्या चोरट्यांनी देवीच्या गळ्यातील अर्धा तोळ्याची दोन मंगळसूत्र, पैंजण व इतर ३५ ग्रॅम चांदी लांबविली. बुधवारी सकाळी चोरीचा प्रकार लक्षात येताच मारीहाळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माळीहाळ पोलिस स्थानकात चोरीच्या घटनेची नोंद आहे.

25 तोळे सोने, 23 हजारांची रक्कम वाचली

दर मंगळवारी लांबवलेल्या ऐवजासह २५ तोळे सोन्याचे दागिने घालून देवीची आरास केली जाते. रात्री आठ वाजता देवीची विशेष पूजा होऊन मंगळसूत्र, पायातील पैंजण वगळता सर्व सोने उतरविले जाते. मंगळवारी रात्रीच देणगी पेटीतील रक्कम काढून त्याची मोजदाद केली होती. पेटीतील २३ हजारांची रक्कम समितीने काढून घेतली होती. त्यामुळे चोरट्यांच्या हाती हे सोने आणि रक्कम लागली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com