पुरोगामी कोल्हापुरात हे काय घडतंय? गुप्तधनासाठी घरात खड्डा खणून अघोरी विधी; केळीच्या पानावर हळद-कुंकू, टाचण्या मारलेले लिंबू अन्..

या घटनेमुळे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Kaulav in Radhanagari
Kaulav in Radhanagariesakal
Summary

तेथे मांत्रिक महेश काशीदसह चौघांकडून केळीच्या पानावर हळद-कुंकू, टाचण्या मारलेले लिंबू, नारळ, सुपारी, केळी ठेवून मंत्रोच्चारात अघोरी विधी सुरू असल्याचे निदर्शनास आले.

शाहूनगर : राधानगरी तालुक्यातील कौलव (Kaulav in Radhanagari) येथे गुप्तधन मिळवण्याचे आमिष दाखवून एका घरामध्ये खड्डा खणून अघोरी धार्मिक विधी करणाऱ्या घरमालक, मांत्रिक व अन्य चौघांना राधानगरी पोलिसांनी (Radhanagari Police) मंगळवारी मध्यरात्री अटक केली आहे. नरबळी, अनिष्ट-अघोरी प्रथा व जादुटोणाविरोधी कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kaulav in Radhanagari
गुप्तधनाच्या गुपिताला सहा महिन्यांनी फुटली वाचा! वाटा न मिळाल्याने तिघांमध्ये वाद, हंडाभर गुप्तधन सापडलं अन्..

घरमालक शरद धर्मा माने (रा. कौलव), मांत्रिक महेश सदाशिव काशिद (राजमाची, ता. कऱ्हाड), अाशिष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ (दोघे रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड) आणि संतोष निवृत्ती लोहार (वाझोली, ता. पाटण), कृष्णात बापू पाटील (पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद माजी उपसरपंच अजित पाटील यांनी दिली. या घटनेमुळे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत राधानगरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कौलव येथे मुख्य रस्त्याशेजारी असणाऱ्या शरद माने यांच्या घरामध्ये गुप्तधन मिळवण्याच्या उद्देशाने गेले आठ दिवस काही प्रकार व धार्मिक विधी सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात ग्रामस्थांमध्ये होती. मंगळवारी रात्री या घरामध्ये अघोरी धार्मिक विधी व जादुटोणा करणाऱ्या पाच व्यक्ती आल्याचे ग्रामस्थांना समजले. ग्रामस्थांनी ही गोष्ट सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या निदर्शनास आणून दिली. कुंभार यांनी सतर्कता दाखवत त्या घरामध्ये जाऊन माहिती घेतली. त्यावेळी तेथे देवघरात चार ते पाच फुटाचा खड्डा खोदल्याचे दिसले.

Kaulav in Radhanagari
कोल्हापुरात चाललंय काय? राजारामपुरीत भरदिवसा पाठलाग करून तरुणाचा दगडाने ठेचून खून; मुरूम टाकून पुसले रक्ताचे डाग

तेथे मांत्रिक महेश काशीदसह चौघांकडून केळीच्या पानावर हळद-कुंकू, टाचण्या मारलेले लिंबू, नारळ, सुपारी, केळी ठेवून मंत्रोच्चारात अघोरी विधी सुरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबत सरपंचांनी घरमालक माने यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षांना बोलावून राधानगरी पोलिसांना याची माहिती दिली.

राधानगरीचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे तत्काळ सहकाऱ्यांसह गावात दाखल झाले. त्यांनी संबंधित घराची पाहणी केली. घरातील खड्डा, शेजारी असणारे लिंबू व इतर संशयास्पद वस्तू यावरून गुप्तधनाच्या लालसेने हा प्रकार केल्याच्या संशय बळावला. त्यांनी घरमालक मानेसह इतर पाचजणांना ताब्यात घेतले. मंगळवारी मध्यरात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Kaulav in Radhanagari
नदीत बुडून दोन युवकांचा दुर्दैवी अंत; 'गणेश'चं अभियंता होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं, मुलासाठी आई-वडिलांनी कष्ट घेतलं, पण..

त्यांच्याकडे चौकशी केली असता, मानेला गुप्तधन मिळवून देण्यासाठी खड्डा खोदल्याचे व विधी केल्याचे अन्य चौघांनी पोलिसांना सांगितले. पाचही जणांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्या सर्वांना एक दिवसाची कोठडी देण्यात आली. निरीक्षक गोरे तपास करीत आहेत. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी सरपंच कुंभार यांच्यासह माजी उपसरपंच अजित पाटील, संदीप चरापले, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वास पाटील, संभाजी पाटील, शहाजी पाटील, उदय पाटील व सदस्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

सतर्क ग्रामस्थांसह सरपंचांमुळे प्रकार उघड

ग्रामस्थांकडून प्रकार समजताच सरपंच रामचंद्र कुंभार यांनी तत्परतेने घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना कळविल्यामुळेच कृत्य उघडकीस आले. मंगळवारी रात्री मानेच्या घरासमोर ग्रामस्थांनी गर्दी करत तीव्र संताप व्यक्त केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावणारा हा प्रकार असून, अघोरी प्रकार नरबळी देण्याच्या हेतूने झाला आहे का, याची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com