

gold Silver price dropped by 24000 in 24 hours
esakal
Gold Silver Market : मागच्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोने-चांदीने आज सकाळच्या सत्रात उच्चांकी भाव नोंदविल्यानंतर दिवसअखेरीस मोठी घसरण नोंदविली. बाजारात चांदीचा भाव रविवारी उच्चांकी दोन लाख ५० हजार रुपये होता तो आज दोन लाख २६ हजार रुपयांवर आला आहे. या भावामध्ये तब्बल २४ हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव हजर बाजारात प्रति दहा ग्रॅमसाठी एक लाख ३४ हजार रुपयांवर आला आहे. आज दिवसभरात त्याचा भाव चार ते पाच टक्क्यांनी घसरल्याची माहिती सूत्रांनी दिली.