

Gold & Silver Prices Surge as US Actions Shake Markets
esakal
Gold Silver Price Today India : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेने व्हेनेझुएलाचे नेते निकोलास मादुरो यांना ताब्यात घेतल्याने जागतीक बाजारात अचानक खळबळ माजली. मागच्या दोन दिवसात शेअर बाजार अचानक कोसळल्याची स्थिती आहे. परंतु सोन्या चांदीच्या दरात मात्र अस्थिरता पहायला मिळत आहे. शेअर बाजार ओपन होताच चांदी २ लाख ४६ हजार रुपयांवर होती तर सोने १ लाख ३८ हजारांवर होती. दरम्यान मागच्या दोन दिवसात चांदी तब्बल ५ हजारांनी तर सोने ३ हजारांनी वाढली असून आणखी दर वाढण्याची शक्यता आहे.