गुडन्यूज : कागल तालुक्यातील 5900 हेक्‍टर शेतीचा पाणी प्रश्न असा सुटला

 Good News: The water problem of 5900 hectares of agriculture in Kagal taluka has been solved
Good News: The water problem of 5900 hectares of agriculture in Kagal taluka has been solved

सेनापती कापशी , कोल्हापूर : कागल तालुक्‍यातील 21 पाझर तलाव आणि सहापैकी पाच लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले. त्यामध्ये 498 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. तालुक्‍यात आतापर्यंत 700 मिलिमीटर पाऊस झाला. या प्रकल्पामुळे 5879 हेक्‍टर शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तालुक्‍यातील चिकोत्रा खोऱ्याला वरदान ठरलेला झुलपेवाडी येथील चिकोत्रा प्रकल्पाचा पाणीसाठा 90 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. 
कागल तालुक्‍यात करंजिवणे, शेंडूर, हणबरवाडी, सोनाळी, पिंपळगाव, बेनिक्रे येथे लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. यापैकी बेनिक्रे येथील प्रकल्प 85 टक्के भरलाआहे, तर उर्वरित पाच लघु प्रकल्प आणि 21 पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चे वातावरण आहे. तालुक्‍याचे 54 हजार हेक्‍टर भोगोलिक क्षेत्र असून त्यामध्ये 25 हजार हेक्‍टर मध्ये ऊस पीक आहे. रब्बी पिकासह या ऊस पिकासाठी आणि ग्रामीण भागाच्या नळ पाणीपुरवठा योजनांसाठी या लघु प्रकल्पांचा तसेच पाझर तलावांचा उपयोग होतो. 

 "चिकोत्रा' 90 टक्‍क्‍यांवर 
यावर्षी चिकोत्रा प्रकल्प क्षेत्रात आजपर्यंत 1674 मिलिमीटर पाऊस झाला. 1522.60 दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या या प्रकल्पाचा साठा 90 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी प्रकल्पात 97 टक्के इतका साठा झाला होता, तर पाऊस 3257 मिलिमीटर इतका झाला होता. 


"तालुक्‍यातील 17 हजार 300 हेक्‍टरवर खरीपाची पिके आहेत. त्यामध्ये तीन हजार हेक्‍टरवर भाजीपाला व चारा, साडे आठ हेक्‍टरवर 
सोयाबीन, साडेपाच हेक्‍टरवर भात आणि अडीच हेक्‍टरवर भुईमुगाचे पीक आहे. पावसामुळे काही ठिकाणी उसामध्ये दोन फुटांपर्यंत पाणी आहे. तर सोयाबीन व भात पिक पाण्याखाली गेले. त्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. तालुक्‍यातील 83.17 हेक्‍टर साठी 399 शेतकऱ्यांनी पीकविमा उतरलेला आहे. यामध्ये कागल तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे.' 
-ए. डी. भिंगारदिवे, तालुका कृषी अधिकारी

- संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com