जिल्ह्यातील २९ लाडक्या बहिणींनी स्वत:हून या योजनेचा लाभ सोडला आहे. याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणेला कळविले आहे. या योजनेमुळे या महिलांचा इतर योजनांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : सरकारने नावावर चारचाकी असणाऱ्या लाडक्या बहिणींची (Ladki Bahin Yojana) पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची माहिती घेऊन पडताळणी करण्याचे काम सुरू झाले आहे.