
कोल्हापूर : महापालिकेच्या नगररचना विभागाने शास्त्रीयदृष्ट्या हद्दवाढीचा परिपूर्ण प्रस्ताव तयार केला आहे. महापालिकेने तो आज आयुक्तांच्या मान्यतेने राज्य शासनाला ई-मेलद्वारे पाठविला. प्रस्तावात लोकसंख्येचा निकष पूर्ण होण्यासाठी शहरालगतची २२ गावे, शहरातील लोकसंख्या, उपलब्ध जागा, ग्रामीण भागाची घनता, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, महापालिकेला वाढीच्या मर्यादा आदी मुद्द्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.