Kolhapur : सरकारी शाळांचा पट ९ टक्क्यांनी वाढला ; सर्वेक्षणातील माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

सरकारी शाळांचा पट ९ टक्क्यांनी वाढला ; सर्वेक्षणातील माहिती

कोल्हापूर : लॉकडाउननंतर राज्यातील सरकारी शाळांचा पट ९ टक्क्यांनी वाढला आहे. राज्यात २०१८ मध्ये ६०.५ टक्के मुलांची सरकारी शाळेत नोंदणी होती. ते प्रमाण वाढून २०२१ मध्ये ६९.७ टक्के झाले आहे, परंतु अजूनही मुलींच्या तुलनेत मुलांची खासगी शाळेतील नोंदणी जास्त आहे.खासगी शिकवणीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सहा टक्क्यांनी वाढून ती २०.७ टक्के झाली आहे. लॉकडाउननंतर दुप्पट विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन उपलब्ध झाल्याचे नुकताच स्पष्ट झाले.

प्रथम संस्थेच्या माध्यमातून ऐन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (ग्रामीण) २०२१ हा आज ऑनलाइन प्रकाशित झाला. त्यानुसार ही माहिती पुढे आली. असर २०२१ सर्वेक्षण २५ राज्य आणि ३ केंद्र शासित प्रदेशात केले गेले. हे सर्वेक्षण एकूण ७६ हजार ७०६ घरांतील ५-१६ वायोगटातील एकूण ७५ हजार २३४ मुलांचे केले गेले. असरने ७ हजार २९९ प्राथमिक इयत्ता असलेल्या सरकारी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांचे सर्वेक्षण केल्याची माहिती असर समन्वयक भालचंद्र सहारे यांनी दिली.

कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा व विद्यालये बंद होती. त्याचा परिणाम घरातील सदस्य आणि मुलांवर कशाप्रकारे झाला, हे समजणे फार महत्त्वाचे होते.

या परिणामांचे आकलन होण्याकरिता राष्ट्रीयस्तरावरील आकडेवारीची आवश्यकता होती. ती पूर्ण करण्यासाठी असरने २०२० मध्ये एक नवीन डिझाईनचे फोन आधारित सर्वेक्षण विकसित केले. यातूम प्राथमिक शाळांतील वेगवगेळे वास्तव पुढे आले. २०२१ मध्ये महाराष्ट्रात ज्या मुलांची शाळेत नोंदणी आहे, अशा ७०.४ मुलांना घरातून अभ्यासाकरिता मदत मिळत आहे. जे प्रमाण राष्ट्रीयस्तरापेक्षा (६६.६%) जास्त आहे.

loading image
go to top