कृषी पंपासाठी सौर संच बसवणे सक्तीचे केल्यामुळे वीज वितरण कंपनीने आपल्या वीज वाहिनीवरून पूर्वीप्रमाणे कनेक्शन देणे बंद केले आहे.
गडहिंग्लज : शासनाने कृषी पंपासाठी (Agricultural Pump) सौर संचच बसवणे सक्तीचे केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Solar Agricultural Pump Scheme) आणली आहे. दुसरीकडे जमिनीतील पाणी पातळी खालावल्यामुळे विंधन विहिरींसाठी पाच किंवा त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या (एचपी) मोटरची आवश्यकता भासत आहे. मात्र, त्यासाठी पाच एकरपेक्षा अधिक जमिनीची अट आहे. परिणामी, छोट्या शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. त्यांच्यासाठी सौर कृषी पंप योजना कूचकामी ठरत असल्याचे चित्र आहे.