Govind Pansare Case : शरद कळसकरने जाळल्या डायऱ्या, मोबाईल हॅण्डसेट; पानसरे हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर

पानसरे खुनातील नऊ क्रमांकाचा संशयित शरद भाऊसो कळसकर (वय २५, केसापुरी, ता. दौलताबाद, जि. औरंगाबाद) आहे.
Comrade Govind Pansare
Comrade Govind Pansareesakal
Summary

विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे (Advocate Shivajirao Rane) यांनी सरतपास घेतला, तर संशयितांच्या वकिलांनी उलट तपास घेतला.

कोल्हापूर : पानसरे खुनातील (Govind Pansare Murder Case) महत्त्वाच्या पुराव्याच्या दोन डायऱ्या आणि गुन्ह्यादरम्यान वापरलेला मोबाईल हॅण्‍डसेट औरंगाबाद (Aurangabad) येथील संशयित शरद कळसकर याने स्वतःच्या शेतात जाळल्याची माहिती न्यायालयात सर तपासात पुढे आली.

पानसरे खुनातील नऊ क्रमांकाचा संशयित शरद भाऊसो कळसकर (वय २५, केसापुरी, ता. दौलताबाद, जि. औरंगाबाद) आहे. त्याला काल न्यायालयात पंचसाक्षीदाराने ओळखले. येथील जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात (Kolhapur Court) ही सुनावणी सुरू आहे.

Comrade Govind Pansare
डोळ्यांदेखत मुलाच्या मृत्यूने आईनेही सोडला प्राण; हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने नागरिकांच्या अश्रूंचा फुटला बांध

विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे (Advocate Shivajirao Rane) यांनी सरतपास घेतला, तर संशयितांच्या वकिलांनी उलट तपास घेतला. पुढील सुनावणी १५ आणि १६ फेब्रुवारीला होणार आहे. पंचसाक्षीदाराने सरतपासात सांगितले की, संशयित डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि इतरांसोबत ठिकठिकाणी घेतलेल्या ट्रेनिंगची माहिती, आपापसांत वापरले जाणारे सांकेतिक शब्द, विविध इव्हेंटची आणि वेपन तयार करण्याची माहिती व डायग्राम स्वतःच्या हस्ताक्षरात त्याने दोन डायऱ्यामध्ये लिहिले होते.

या डायऱ्या आणि गुन्ह्यादरम्यान वापरलेला मोबाईल हॅण्‍डसेट त्यांच्या वडिलोपार्जित मिळालेल्या औरंगाबाद येथील शेतात या गुन्ह्यात अटक करण्यापूर्वी एक वर्षांपूर्वी जाळले आहेत, अशी कबुली संशयित शरद कळसकरने दिली आहे. याच ठिकाणाचा पंचनामा विशेष तपास पथकातील पोलिस निरीक्षक विजय पाटील आणि पथकाने केला आहे. तेव्हा मी तेथे उपस्थित होतो. औरंगाबाद पोलिस मुख्यालयातून आम्ही खासगी मोटारीतून तेथे गेलो होतो. दोन डायऱ्या आणि मोबाईल हॅण्‍डसेट जाळल्याची जागा स्वतः कळसकरने दाखविली आहे, अशी माहिती सरतपासात औरंगाबाद येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील संबंधित पंचसाक्षीदाराने दिली.

Comrade Govind Pansare
Car Accident : कार अपघातात तीन बालकांसह चौघांचा मृत्यू; चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना

दरम्यान, उलट तपासात औरंगाबाद येथील पोलिस मुख्यालयातून घटनास्थळी जाण्यासाठी किती वेळ लागला, गाडीचे किलोमीटर नोंद केले का, चालकाचे नाव विचारले का, तसेच पंचनाम्‍यामधील सर्व माहिती पोलिसांना मदत करण्यासाठी तुम्ही न्यायालयात देत आहात, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती संशयितांच्या वकिलांनी पंचसाक्षीदारांवर केली. संशितांच्या वतीने ॲड. अनिल रुईकर, ॲड. समीर पटवर्धन, ॲड. डी. एम. लटके यांनी उलट तपास घेतला. न्यायालयात पुण्यातील येरवडा कारागृहातील संशयित हजर होते, तर कर्नाटकातील संशयित व्हीसीद्वारे सहभागी झाले होते.

Comrade Govind Pansare
Raireshwar Fort : 'तो' सेल्फी ठरला अखेरचा! रायरेश्वर किल्ल्यावरुन खाली दरीत कोसळून हुपरीच्‍या तरुणाचा मृत्यू

पंचसाक्षीदार गोंधळला...

संशयित कळसकर न्यायालयात कोठे बसला आहे, ते दाखविण्याचे आदेश न्यायालयाने पंचसाक्षीदाराला दिले. यानंतर पंचसाक्षीदार संशयित आरोपींच्या समोर जाऊन उभा राहिला. मात्र, त्याला तातडीने कळसकरला ओळखता आले नाही. पाच ते दहा मिनिटांनंतर न्यायाधीशांनी त्यांना पुन्हा साक्षीदार कोठडीत बोलावले. सर्व सुनावणी पाच मिनिटे थांबविली. पुन्हा संशयिताला ओळखण्याचे आदेश दिले. त्यानंतरही पंचसाक्षीदाराने तातडीने त्याला ओळखले नाही. काही वेळानंतर त्याने शरद कळसकरला ओळखले. तसेच पूर्वी दाढी होती, पाच-सहा वर्षांपूर्वी पाहिल्यामुळे आता तातडीने ओळखणे कठीण झाल्याचेही पंच साक्षीदाराने न्यायालयात सांगितले. काही कालावधी घेतला. मात्र, कळसकरला ओळखले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com