Govind Pansare Murder Case
Govind Pansare Murder Caseesakal

Govind Pansare Murder Case : सारंग आकोळकर-वीरेंद्र तावडेमध्ये ई-मेलद्वारे संपर्क; CBI कडून वस्तू जप्तीचा पंचनामा सादर

Govind Pansare Murder Case : सुनावणीला कळंबा कारागृहातील तीन संशयितांना न्यायालयात आणण्यात आले होते.
Published on
Summary

पुण्यामध्ये डॉ. दाभोळकर याच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआय पथकाने २०१६ मध्ये सारंग आकोळकरच्या घरात छापा टाकून मोबाईल, ई-मेल, डायरी, वृत्तपत्रे, पेन ड्राईव्ह, दोन वृत्तपत्रे अशा वस्तू जप्त केल्या होत्या.

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे हत्येतील (Govind Pansare Murder Case) संशयित सारंग आकोळकर याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला होता. डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) हत्येच्या तपासादरम्यान २०१६ मध्ये या वस्तू जप्त केल्या होत्या. सारंग आकोळकर आणि पानसरे हत्‍येतील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे (Dr. Virendra Tawde) यांच्यातील ई मेलद्वारे देवाणघेवाण झाल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com