
उजळाईवाडी : गडमुडशिंगी (ता. करवीर) ग्रामपंचायत कार्यालयाच्या मुख्य महिला पदाधिकारी व त्यांच्या पतीविरोधात जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीची तक्रार ग्रामपंचायतीचे लिपिक अविनाश पांडुरंग कांबळे (वय ५०) यांनी दिली आहे. त्यानुसार या दोघांवर गांधीनगर पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर ग्रामपंचायत मुख्य महिला पदाधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अविनाश कांबळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.