
Gram Panchayat Member : वारंवार पोलिस तक्रारी करून त्रास दिल्याच्या रागातून राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे कार्यकर्ते रांगोळी ग्रामपंचायतीचे सदस्य लखन आण्णाप्पा बेनाडे (वय ३२, रा. रांगोळी, हातकणंगले) याचा शाहू टोल नाक्यावरून अपहरण करून खून करण्यात आला. त्यानंतर क्रूरतेचा कळस गाठत संकेश्वर येथे नेऊन त्याचे पाच तुकडे करण्यात आले. त्याचे हात, पाय काय, तर शिरही धडावेगळे करण्यात आले. शरीराचे हे सारे तुकडे एका पोत्यात भरून हिरण्यकेशी नदीत फेकल्याची कबुली संशयितांनी दिली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आज दिली.