कोल्हापूर : ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांच्या आरक्षणाची (Sarpanch Reservation) सोडत मंगळवारी (ता.८) दुपारी तीन वाजता होणार आहे. यामध्ये १०२६ ग्रामपंचायतींचा अंतर्भाव असून, प्रत्येक तालुक्याची स्वतंत्र सोडत होईल. सर्व ग्रामस्थांना याची माहिती व्हावी, यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आणि ग्रामसेवकांनी याची व्यापक प्रसिद्धी करायची आहे, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.