आजीने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्या रागापोटी तो त्याचा मित्र नरेश ऊर्फ नरेंद्र दगडू करपे व एका अल्पवयीनला घेऊन काल दुपारी आजीच्या घरी आला. त्यांनी आजीचा गळा दाबून, डोके आपटून खून केला.
सेनापती कापशी : कर्जबाजारी नातवाने आजीकडे पैशांची मागणी केली. आजीने नकार दिल्याने मित्रांच्या मदतीने ८२ वर्षांच्या आजीचा त्याने खून केला. तिचे सोने घेऊन पोबारा करणाऱ्या संशयित आरोपी नातवाला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (Local Crime Investigation Team) रात्रीत अटक केली.