'माझे आणि प्रभू श्रीरामांचे वेगळेच ऋणानुबंध, कारण माझा जन्म रामनवमी दिवशीचा'; असं का म्हणाले मुश्रीफ?

पूर्वी घाटगे यांच्या वंशजांची जागा होती हे आम्ही नाकारले नाही. पण, आता हे मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे आहे.
Hasan Mushrif Kagal Ram Temple
Hasan Mushrif Kagal Ram Templeesakal
Summary

राजकीय संघर्षात विक्रमसिंह घाटगे व आपण एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर कागलचे श्री राम मंदिर उभारण्याची कल्पना पुढे आली.

कागल : ‘पंधरा वर्षांपूर्वी कागलमध्ये बांधलेले प्रभू श्री रामचंद्रांचे भव्यदिव्य मंदिर (Kagal Ram Mandir) शहरासह जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे आहे. या मंदिराच्या उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकलो याचे आत्मिक समाधान आणि आनंद मोठा आहे’, अशी भावना पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केली.

श्रीराम मंदिरासह विविध देवदेवतांच्या ७०० हून अधिक मंदिरांची पुण्याई पाठीशी असल्याचेही, त्यांनी यावेळी सांगितले. कागलमध्ये शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते.

Hasan Mushrif Kagal Ram Temple
शिवाजी विद्यापीठात 57 वर्षांपूर्वीच वाल्मिकी ऋषींच्या 'रामायणा'वर झाले संशोधन; कथेची वेगळ्या भूमिकेतून केली पाहणी

मुश्रीफ म्हणाले, ‘कागलचे श्री राम मंदिर आजही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडेच आहे. राजकीय संघर्षात विक्रमसिंह घाटगे व आपण एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर कागलचे श्री राम मंदिर उभारण्याची कल्पना पुढे आली. त्यावेळी पश्चिम देवस्थान समितीचे गुलाबराव घोरपडे यांनी संमती दिली. यामध्ये विक्रमसिंह घाटगे अध्यक्ष झाले व मी उपाध्यक्ष झालो. त्यावेळी या श्रीराम मंदिर परिसरात शिवाजी सोसायटी, इंदिरा पतसंस्था, दूध संस्था, होमगार्डचे कार्यालय आणि प्राथमिक शाळा ही होती.

या संस्था या जागेतून दूर करण्याची जबाबदारी विक्रमसिंह घाटगेंनी माझ्यावर सोपवली होती. श्री राम मंदिरचे आर्थिक नियोजन करताना घाटगेंनी लोकवर्गणीतून हे मंदिर उभे करायचे असे सांगितले. शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून कपात करून ही वर्गणी गोळा करायचा, असा त्यांचा विचार होता. त्यावेळी मी नगरविकासमंत्री होतो.

Hasan Mushrif Kagal Ram Temple
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर उत्सवाची जगाच्या इतिहासात नोंद घेतली जाईल - मंत्री चंद्रकांत पाटील

यातून तीन ते साडेतीन कोटींचा निधी आम्ही नगरपालिकेला दिला. आज या आनंदाच्या क्षणी हा वाद उकरून काढायला नको होता. पूर्वी घाटगे यांच्या वंशजांची जागा होती हे आम्ही नाकारले नाही. पण, आता हे मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे आहे. माझे आणि प्रभू श्री रामांचे वेगळेच ऋणानुबंध आहेत. कारण माझा जन्म रामनवमी दिवशीचा आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com