कोल्हापूर : ‘तुम्ही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम घेता; पण त्याची माहिती स्थानिक आमदारांनाच नसते. केवळ कार्यालयात बसून कागद रंगवून चालणार नाही. शेतकऱ्यांच्या (Farmers) बांधावर जाऊन योजना राबविल्या पाहिजेत. स्थानिक आमदारांना भेटून तुम्ही काय काम केले, हे सांगितले पाहिजे,’ अशा शब्दांत पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी कृषी विभागातील (Agriculture Department) अधिकाऱ्यांना झापले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.