esakal | Gokul Update: राखीव पाचही जागांवर विरोधक आघाडीवर:महिला गटात रस्सीखेच

बोलून बातमी शोधा

Gokul Update: राखीव पाचही जागांवर विरोधक आघाडीवर:महिला गटात रस्सीखेच
Gokul Update: राखीव पाचही जागांवर विरोधक आघाडीवर:महिला गटात रस्सीखेच
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) (Gokul Election Result) निवडणुकीत राखीव पाच जागांपैकी इतर मागासवर्गीय, भटक्‍या विमुक्त व अनुसुचित जाती प्रवर्ग गटात विरोधी आघाडीचे उमेदवार 100 ते 125 मतांनी आघाडीवर आहेत तर महिला प्रतिनिधी गटात सत्तारूढ आघाडीच्या दोन्हीही उमेदवार आघाडीवर आहेत.

"गोकुळ' ची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता रमणमळा (RamanMala Area)परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात (Hall of Revenue Welfare Fund)सुरू झाली. सुरूवातील 70 मतदान केंद्रावरील सर्व गटाच्या मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येक गटनिहाय 50 मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यात आले.

सुरूवातीला पाच राखीव गटांची मतमोजणी सुरू करण्यात आली. त्यात अनुसुचित जाती प्रवर्गातून विरोधी आघाडीचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, भटक्‍या विमुक्त गटातून बयाजी शेळके तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातून अमरसिंह यशवंत पाटील तर महिला गटातून श्रीमती अंजना रेडेकर व सौ. सुश्‍मिता राजेश पाटील यांनी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत एक हजार मतांची मोजणी पूर्ण झाली असून अद्याप 1600 मतांची मोजणी अपूर्ण आहे.

हेही वाचा- कोरोनाकाळात ठरेल तुमच्यासाठी संजीवनी; घरीच मिळवा आता ऑक्‍सिजन; लावा ही झाडे