esakal | Gokul Election : सतेज पाटील गटाचे खात उघडले: मिणचेकर, पाटील, शेळके विजयी

बोलून बातमी शोधा

null
Gokul Election : सतेज पाटील गटाचे खाते उघडले: मिणचेकर, पाटील, शेळके विजयी
sakal_logo
By
सुनील पाटील, संदीप खांडेकर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत (Gokul Election) अनुसुचित जाती गटातून विरोधी आघाडीचे उमेदवार (Opposition Front candidates) माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, (Dr. Sujit Minchekar) इतर मागासवर्गीय गटातून अमर पाटील,(Amer Patil) तर भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून बयाजी शेळके(Bayaji Shelke) विजयी झाले. मिणचेकर यांना ३४६, तर पाटील ४३१ मते मिळाली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलमधील हे उमेदवार असून त्यांच्या विजयाने समर्थकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

निवडणुकीत सत्तारूढ गटातील विद्यमान संचालक विलास कांबळे (अनुसूचित जाती), पी. डी. धुंदरे ( इतर मागासवर्गीय? व विश्वास जाधव (भटक्या विमुक्त) पराभूत झाले आहेत. महिला गटांत रस्सीखेच सुरू असून सत्ताधारी गटाच्या अनुराधा पाटील-सरूडकर यांना ४१५ तर शौमिका महाडिक यांना ४१० मते मिळाली आहेत. विरोधी गटातील सुश्मिता पाटील यांना ४२० तर अंजना रेडेकर यांना ४६३ मते मिळाली आहेत.

हेही वाचा- Gokul Update: राखीव पाचही जागांवर विरोधक आघाडीवर:महिला गटात रस्सीखेच

दरम्यान, मिणचेकर यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पालकमंत्री सतेज पाटील व मिणचेकर यांच्या नावाचा जयघोष करत गुलालाची उधळण केली.

Guardian Minister Satej Patil v. Former MLA Mahadevrao Mahadik Kolhapur Gokul Doodh Sangh Election

.