गडहिंग्लज तालुक्‍यातील "हा' डोंगर बनतोय फिटनेस सेंटर

Guddai Dongar In Gadhinglaj Taluka Is Becoming A Fitness Center Kolhapur Marathi News
Guddai Dongar In Gadhinglaj Taluka Is Becoming A Fitness Center Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : येथून पाच किलोमीटर अंतरावरील गुड्डाई डोंगरावर (भडगाव) व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात सरावासाठी युवकांची गर्दी आहे. डोंगरावरील चढउतार तंदुरुस्तीचा कस पाहणारा आहे. पोलिस, सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी गट करून या ठिकाणी सराव वाढविला आहे. अल्हाददायक वातावरणामुळे शहरासह लगतच्या गावातूनही फिरायला येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. 

गेल्या दशकभरात गुड्डाई डोंगराचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. डोंगरावरील मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता करण्यात आला आहे. तसेच पायी चालत जाणाऱ्यांसाठी पायऱ्यांची सोयही झाली आहे. डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाल्याने हिरवळ वाढली आहे. मंदिराजवळ बसण्यासाठी सभागृह बांधण्यात आले आहे. तेथून नजरेच्या टप्प्यात जवळपास सारा तालुका येतो. यामुळे गुड्डाईला जाणाऱ्यांची संख्या अलिकडच्या कालावधीत वाढल्याचे दिसून येते. 

ग्रामीण भागात पोलिस, सैन्य दलात भरती होण्याची युवकांत मोठी क्रेझ आहे. मैदान नसतानाही जागा मिळेत तिथे सराव करून भरती होण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. त्यामुळेच अनेकदा रस्त्यावर धावणारे युवक हे चित्र सार्वत्रिक झाले आहे. युवकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ग्रामीण भागात अनेक ठिकाणी या भरतीला मार्गदर्शन करणाऱ्या ऍकॅडमी सुरू झाल्या आहेत. त्या ठिकाणी शारिरीक तंदुरुस्तीबरोबर लेखी परीक्षेसाठी तयारी करून घेतली जाते.

अशा ऍकॅडमीत प्रशिक्षित झालेले युवक आपापल्या गावातील इतरांना सरावासाठी मार्गदर्शन करीत आहेत. अशाच युवकांच्या गटांनी गुड्डाई डोंगरावर सराव सुरू केला आहे. गटागटाने हे युवक या डोंगरावर सरावासाठी दाखल होतात. मंदिरालगत असणाऱ्या सभागृहाचा बैठ्या व्यायामासाठीही वापर केला जात आहे. 

डोंगरावर चढ-उतार असल्याने पळताना कस लागतो. सहाजिकच यामुळे शारिरीक तंदुरुस्ती वाढते. ही जमेची बाजू असल्याने युवकांची गुड्डाई डोंगराला पसंती दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सायंकाळच्या सत्रात या मार्गावर फिरायला येणाऱ्या ग्रामस्थ, नागरीकांची संख्याही अधिक आहे. खासकरुन संध्याकाळी अल्हाददायक वातावरण असल्याने पर्यटन म्हणून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 

लॉकडाऊनने वाढविली गर्दी...
गेल्या सहा महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. व्यवहार बंद असल्याने व्यापारी, विक्रेते, नागरीक सहकुटुंब गुड्डाईवर देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. शहरातून रोज गुड्डाईला फिरायला जाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. लॉकडाऊनमुळे नेहमीपेक्षा अधिक गर्दी डोंगरावर पहायला मिळत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com