
Cultural Pride Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जिनसेन मठातील एक आठवड्यांपूर्वी गुजरात येथील जामनगरच्या वनतारामध्ये माधुरी उर्फ महादेवी हत्तीला हस्तांतरीत करण्यात आलं. हत्तीने निरोप घेतला त्यादिवशी हत्तीणीसह अखंड कोल्हापूरकरांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा पहायला मिळाल्या. यानंतर हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी कंबर कसली अन् याची दखल प्रत्यक्ष वनताराला मराठीमध्ये घ्यावी लागली. वनतारा संस्थेने मागील आठवड्यात सर्व अधिकृत पत्रव्यवहार मराठी भाषेत केला आहे. कोल्हापूरकरांसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अप्रत्यक्ष भाषाभिमानाच्या विजयाची घटना ठरली.