

Gokul Government Nominated Members
esakal
Gokul Voting Rights : पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर चार शासननियुक्त सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, या चारही सदस्यांना मतदानाचा अधिकार असेल, अशी माहिती पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावर होण्याची शक्यता असून, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीच्या बहुमतापुढे महायुती नवे आव्हान उभे करू शकते.