
मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला आहे. मराठा समाजाबद्दल द्वेष निर्माण केल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता कोल्हापूर पोलिसांकडे सदावर्तेंचा ताबा देण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस सदावर्तेंच्या ताब्यासाठी सकाळी मुंबईच्या कोर्टात हजर झाले होते. (Gunaratna Sadavarte again in trouble Kolhapur police will take possession)
सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलीस मुंबईतील ऑर्थर रोड जेलकडे रवाना होणार आहेत. आधी मुंबई पोलीस त्यानंतर सातारा पोलीस आणि आता कोल्हापूर पोलीस यांनी सदावर्तेंचा ताबा घेतला आहे. त्यामुळं त्यांच्यामागची संकटाची मालिका संपताना दिसत नाहीए. याशिवाय सदावर्तेंविरोधात सदावर्तेंविरोधात आणखी गुन्हे दाखल आहेत.
कोल्हापूर आणि अकोला पोलीस सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आज कोर्टात दाखल झाले होते. यामध्ये पहिल्यांदा कोल्हापूर पोलिसांकडे त्यांचा ताबा देण्यात आला. चौकशीनंतर सदावर्तेंना पुन्हा न्यायालयीन कोठडी मिळेल तेव्हा अकोला पोलिसांना त्यंचा मिळू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.