Mango Cashew Crop : अवकाळी हवामानाचा दुहेरी फटका; गारपीट, वादळ आणि वीज कोसळल्याने शेती व उद्योग दोन्ही संकटात

Agriculture Loss : गारपीट, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे जिल्ह्यातील शेती आणि उद्योग दोन्ही क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. आंबा-काजू बागांचे नुकसान झाले असून वीटभट्टी व्यवसायही प्रभावित झाला आहे.
Unseasonal Rain

Unseasonal Rain

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज गारपिटीसह वळीव पावसाने हजेरी लावली. वादळी पावसाने राधानगरी तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. तर आजऱ्यात आठवडी बाजारात तारांबळ उडाली. पन्हाळा तालुक्यातील पडसाळीत गारपिटीने नुकसान झाले. कागल तालुक्यातील म्हाकवे, आणूर, बानगे, सोनगे, हमिदवाडा, लिंगनूर कापशी तसेच अनेक भागांमध्ये आज दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह वळीव पावसाची सुरुवात झाली. वादळी वाऱ्याचा वेग जोरदार होता. वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com