esakal | हळदीत व्यापारी आक्रमक ; ग्रामसेवकांला कार्यालयातच केले बंदिस्त :kolhapur news
sakal

बोलून बातमी शोधा

हळदी व्यापारी

पंचनाम्यात ग्रामसेवकांनी केलेल्या चुकीच्या मूल्यमापनामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या व्यापाऱ्यांचे आणखी नुकसान केले आहे.

हळदीत व्यापारी आक्रमक ; ग्रामसेवकांला कार्यालयातच केले बंदिस्त

sakal_logo
By
साईनाथ पाटील

हळदी (कोल्हापूर) : येथे दोन महिन्यापूर्वी आलेल्या महापुरात व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे चुकीचे पंचनामे केले, अनेक नुकसानग्रस्तांना वंचित ठेवून नुकसानग्रस्तांची चुकीची यादी बनवली तसेच झालेल्या नुकसानीपेक्षा कमी रक्कमेचे नुकसान दाखवून पंचनाम्याच्या कामामध्ये ग्रामसेवक राजाराम परीट यांनी मोठ्या प्रमाणात घोळ घातल्याने त्यांना निलंबित करावे अशी मागणी करत येथील सर्व व्यापाऱ्यांनी काल (बुधवार) ग्रामपंचायत वर धडक मोर्चा काढला व ग्रामसेवकांना धारेवर धरले. तब्बल तीन तासाच्या गोंधळानंतर संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी ग्रामसेवकांच्या दालनास कुलूप लावून त्यांना दोन तास कार्यालयातच डांबून ठेवले.

सदर पंचनाम्यात ग्रामसेवकांनी केलेल्या चुकीच्या मूल्यमापनामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या व्यापाऱ्यांचे आणखी नुकसान केले आहे. पंचनामा करतेवेळी व्यापाऱ्यांचे म्हणणे नीट ऐकून घेतले नाही तसेच शासकीय नियमांची चुकीची माहिती सांगून त्यांनी व्यापा-यांची दिशाभूल केली. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान होऊन देखील अनेक व्यापाऱ्यांच्या खात्यामध्ये किरकोळ रक्कम जमा होणार असेल तर या सगळ्या चुकीच्या प्रकाराला ग्रामसेवकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वांनी लावून धरली.

काल ग्रामपंचायतची मासिक सभा होती त्यावेळी सभेच्या सुरुवातीलाच संतप्त व्यापाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. परिणामी संपूर्ण दिवसभर या घटनेची चर्चा हळदी गावासह पंचक्रोशीत सुरू होती.

loading image
go to top