VIDEO : निवडणुकीत सत्ता येताच माजी सरपंचाकडून हवेत गोळीबार; शांतता भंग करण्याचा ठपका ठेवत पोलिसांत गुन्हा दाखल
Former Sarpanch Firing Video Viral : दूध संस्थेतील विजयानंतर भापकर याने गावात हवेत गोळीबार केल्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची तातडीने दखल घेत पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली.
कोल्हापूर : हणमंतवाडीतील दूध संस्थेच्या निवडणुकीत (Hanmantwadi Dudh Sanstha Election) सत्ता आल्याने माजी सरपंचाने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, हा व्हिडिओ आताचा नसून ऑक्टोबर २०२१ मध्ये दसरा सणाचा असल्याचे समोर आले.