esakal | कोकणात हापूस उत्पादन घटले; "इंडियन अल्फान्सो' ला डिमांड
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणात हापूस उत्पादन घटले; "इंडियन अल्फान्सो' ला डिमांड

कोकणात हापूस उत्पादन घटले; "इंडियन अल्फान्सो' ला डिमांड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवगड (सिंधुदुर्ग): कोकणातील हापूस यंदा प्रक्रीया उद्योगाकडे (कॅनिंग) पाठ फिरवण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आंबा पिकाच्या एकूणच उत्पादनात झालेली घट, बाजारातील टिकून राहिलेले दर, बागायतदारांकडे आंब्यासाठी थेट वाढलेली मागणी आणि त्यातून मिळणारा वाढीव दर यामुळे कॅनिंगसाठी आंबा कमी येऊ लागला आहे. तालुक्‍यात कॅनिंग व्यवसाय सुरू झाला असला तरी त्याला अल्प प्रतिसाद असल्याचे व्यावसायिक सांगतात.

आंबा हंगामातील कॅनिंग महत्वाचा टप्पा मानला जातो. चांगली प्रतवारी केलेली आंबा फळे बाजारात विक्रीस गेल्यानंतर उर्वरित आंबा कॅनिंगसाठी दिला जातो. व्यावसायिकांकडून बागायतदाराच्या बागेत फिरून आंबा गोळा केला जातो तर काहीवेळा बागायतदार आपला आंबा कॅनिंग केंद्रावर आणून देतो. त्यामुळे कमी प्रतीचा किंवा प्रतवारी करून शिल्लक राहिलेल्या आंब्याचेही चांगले पैसे होतात. एप्रिलच्या मध्यावर व्यवसायाला सुरूवात होऊन अखेरच्या टप्यात व्यवसाय चांगलाच जोर धरत असल्याचे यापूर्वीचे चित्र होते. याकाळात बाहेरील कॅनिंग व्यावसायिक येथे येऊन आपली मागणी नोंदवतात. त्यानुसार स्थानिक मोठे कॅनिंग व्यावसायिक त्यांना आंबा पाठवतात. सायंकाळी कॅनिंग केंद्रावर आंबा येण्यास सुरूवात होते.

हेही वाचा- कनवकवली जनता कर्फ्यु

रात्रीच्यावेळी गाड्या भरून आंबा रवाना होतो. त्यामुळे बागायतदारांना शिल्लक कमी प्रतिच्या आंब्याचाही चांगला दर मिळून त्यातून पैसा उभा राहतो. यंदा मात्र हापूसच्या उत्पादनात एकूणच झालेल्या घटीमुळे आंबा कॅनिंग व्यवसाय अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. एकीकडे उत्पादन घटले असल्याने तर दुसरीकडे ग्राहकांची मागणी वाढत असल्याने आंब्याचे दर टिकून आहेत. त्यामुळे कॅनिंगकडे म्हणावा तसा आंबा अजूनही उपलब्ध होत नाही.

गेल्या दोन दिवसापासून आंबा कॅनिंग हंगामास सुरूवात झाली आहे; मात्र कॅनिंगला आंब्याचा अल्प प्रतिसाद आहे. सध्या सुमारे 30 रूपये कॅनिंगचा दर आहे; मात्र कॅनिंगसाठी येणाऱ्या आंब्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे यंदा प्रक्रीया उद्योगाला कोकणातून आंबा कमी मिळण्याची शक्‍यता आहे. पर्यायाने हापूसची प्रक्रीया उद्योगाकडे पाठ राहण्याची शक्‍यता आहे.

यंदा हापूसचे उत्पादन घटल्याने कोकणातील हापूस प्रक्रीया उद्योगासाठी पुरेसा मिळणार नाही. दरवर्षी एप्रिलअखेर दिवसाकाठी कॅनिंगला आंब्याच्या दहापेक्षा अधिक गाड्या जात होत्या. आता दोनच जातात. कोकणात पुरेसा आंबा न मिळाल्यास उद्योजक कर्नाटक हापूसकडे वळतील. "इंडियन अल्फान्सो' म्हणूनच त्यांची खरेदी होते. कोकणातील हापूस मिळाला नाही तरी फारसा परिणाम जाणवणार नाही.

- मंगेश वेतकर, कॅनिंग व्यावसायिक, पडेल (देवगड)

Edited By- Archana Banage

loading image
go to top