Kolhapur Municipal : कोल्हापुरात रस्त्यांची दुर्दशा, शहर अभियंतापदाचा खेळखंडोबा; सव्वा महिन्यात हर्षजित घाटगेंची बदली

kolhapur Municipal Engineer : कार्यकारी अभियंता हुद्द्यावरील अधिकाऱ्याला डावलून कनिष्ठ असलेल्या उपशहर अभियंतापदाच्या हुद्द्यावरील अधिकाऱ्याची नेमणूक करून शासनाने या पदाचा खेळखंडोबा केल्याची भावना आहे.
Kolhapur Municipal
Kolhapur Municipalesakal
Updated on

Kolhapur Municipal Engineer Transferred : महापालिका शहर अभियंतापदाच्या नियुक्तीत शासनाने हस्तक्षेप करत सव्वा महिन्यापूर्वी कार्यभार घेतलेल्या हर्षजित घाटगे यांना आज तडकाफडकी बदलून रमेश मस्कर यांची नियुक्ती करायला लावली. दोन वर्षांत शासनाने या पदासाठीचा हा तिसरा आदेश काढला आहे. कार्यकारी अभियंता हुद्द्यावरील अधिकाऱ्याला डावलून कनिष्ठ असलेल्या उपशहर अभियंतापदाच्या हुद्द्यावरील अधिकाऱ्याची नेमणूक करून शासनाने या पदाचा खेळखंडोबा केल्याची भावना आहे. या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com