esakal | Good News - शेतकऱ्यांना दिलासा; विम्याचे 51 कोटी लवकरच खात्यावर जमा होणार
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांना दिलासा; विम्याचे 51 कोटी लवकरच खात्यावर जमा होणार

विमा कंपनीने मंडलनिहाय निश्चित केलेल्या आकडेवारीनुसार एकूण ५१ कोटी ७१ लाख रुपये रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खाती लवकरच जमा होणार आहे.

शेतकऱ्यांना दिलासा; विम्याचे 51 कोटी लवकरच खात्यावर जमा होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : हवामान आधारित काजू, आंबा फळपीक विमा योजना २०२०- २१ अंतर्गत जिल्ह्यासाठीची विमा रक्कम जाहीर झाली आहे. विमा कंपनीने मंडलनिहाय निश्‍चित केलेल्या आकडेवारीनुसार एकूण ५१ कोटी ७१ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खाती लवकरच जमा होणार आहेत, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला आहे, त्यांना नुकसान भरपाईचा प्रत्यक्ष लाभ लवकरच मिळणार आहे. काजू पीकविमा योजनेसाठी कमीत कमी प्रतिहेक्‍टरी १३ हजार रुपये व जास्तीत जास्त प्रतिहेक्टरी ६१ हजार रुपये जाहीर झाले आहेत. आंबा पीकविम्यासाठी कमीत कमी प्रतिहेक्‍टरी १२ हजार २००, तर जास्तीत जास्त प्रतिहेक्टरी ८३ हजार ९०० रुपये जाहीर झाले आहेत. विमा कंपनीने मंडलनिहाय निश्चित केलेल्या आकडेवारीनुसार एकूण ५१ कोटी ७१ लाख रुपये रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खाती लवकरच जमा होणार आहे.’’

हेही वाचा: होय! माझं हृदय धडकतं उजव्या बाजूला; मला समजलं 37 व्या वर्षी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत फळ पीकविम्याची रक्कम जमा होताच आपल्या जमा होणाऱ्या खात्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाला बँकेमार्फत विमा रकमेचा मेसेज करण्यात येईल. जिल्हा बँकेशी संलग्न असलेल्या शेतकऱ्यांनी आपले बचत खाते नियमित असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सावंत यांनी केले आहे.

विमा कंपनीने मंडलनिहाय निश्चित केलेल्या आकडेवारीनुसार आंबा पीकविमा रक्कम (प्रतिहेक्टरी) -

बापार्डे- ३० हजार ५००, देवगड- १२ हजार २००, मिठबाव-१९ हजार, पडेल- १२ हजार २००, पाटगाव- ४८ हजार ४००, शिरगाव- ४८ हजार ४००, भेडशी- ४८ हजार ४००, तळकट- ४८ हजार ४००, फोंडा- ६७ हजार ४००, कणकवली- ८१ हजार ३८०, नांदगाव- ६७ हजार ४००, सांगवे- ७७ हजार ०८०, तळेरे- ५८ हजार ८५०, वागदे- ७७ हजार ८०, कडावल- ६७ हजार ४००, कसाल- ७७ हजार ८०, कुडाळ- ५८ हजार ८५०, माणगाव- ६७ हजार ४००, पिंगुळी- ६७ हजार ४००, वालावल- ५३ हजार ८०, आचरा- ५३ हजार ८०, आंबेरी- ४० हजार ८८०, मालवण- १९ हजार, मसुरे- ७७ हजार ८०, पेंडूर- ६७ हजार ४००, पोईप- ७७ हजार ८०, श्रावण- ७७ हजार ८०, आजगाव- ४३ हजार ४००, आंबोली ३१ हजार ९३०, बांदा ५८ हजार ८५०, मडुरा- ६७ हजार ४००, सावंतवाडी- ६७ हजार ४००, भुईबावडा- ८३ हजार ९००, वैभववाडी- ५२ हजार ७००, एडगाव- ४८ हजार ४००, म्हापण- १९ हजार, शिरोडा- ४९ हजार ५००, वेंगुर्ला- १९ हजार, वेतोरे- ६७ हजार ४००.

हेही वाचा: दोन अशा शाकाहारी डिश खाल्ल्यावर विसराल मांसाहारी टेस्ट; वाचा रेसिपी

काजू पीकविमा योजनेंतर्गत (प्रतिहेक्टरी रुपयात) रक्कम अशी -

मिठबाव- २६ हजार, फोंडा- २६ हजार, कणकवली- ५३ हजार, नांदगाव- २६ हजार, सांगवे- २६ हजार, तळेरे- १३ हजार, वागदे- ३९ हजार, कडावल- ५२ हजार, कसाल- ३९ हजार, कुडाळ- १३ हजार, माणगाव- ३९ हजार, पिंगुळी- ३९ हजार, वालावल- ३९ हजार, आचरा- ५२ हजार, आंबेरी- ५२ हजार, मालवण- २६ हजार, पेंडूर- ५२ हजार, पोइप- ३९ हजार, श्रावण- २६ हजार, आजगाव- २६ हजार, आंबोली- ४८ हजार, बांदा- १३ हजार, मडुरा- ५२ हजार, सावंतवाडी- ३९ हजार, भुईबावडा- ६१ हजार, वैभववाडी- १४ हजार, म्हापण- ३९ हजार, शिरोडा- २६ हजार, वेंगुर्ला- ३९ हजार, वेतोरे- ३९ हजार.

loading image
go to top