

Minister Hasan Mushrif's severe attack on Congress leader Satej Patil
Sakal
कोल्हापूर : 'गोकुळ' दूध संघावर नियुक्त केलेल्या चार शासननियुक्त संचालकांच्या मतदानाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने हिरवा कंदील दाखवताच कोल्हापुरातील राजकीय रणकंदन शिगेला पोहोचले आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर महायुतीची ताकद १६ वर पोहोचली असून, महायुतीचे नेते तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज (बंटी) पाटील यांच्यावर अत्यंत घणाघाती पलटवार केला आहे.