esakal | दहा दिवसाला बिल देऊन उपकार करता का? हसन मुश्रीफांचे महाडीकांवर टिकास्त्र

बोलून बातमी शोधा

दहा दिवसाला बिल देऊन उपकार करता का? हसन मुश्रीफांचे  महाडीकांवर टिकास्त्र
दहा दिवसाला बिल देऊन उपकार करता का? हसन मुश्रीफांचे महाडीकांवर टिकास्त्र
sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर : गोकुळचे सत्ताधारी हे 3, 13 , 23 तारखेला बिल दिले जातात, असे सांगतात. अहो, गवळी देखील १० दिवसाला पैसे देतात. नाही दिले तर दूध घालणार कोण? पैसे देता म्हणजे काय उपकार करता का, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ना. मुश्रीफ म्हणाले, आम्ही सर्व संस्था चांगल्या चालवल्या आहेत.जिल्हा बँक अव्वल स्थानी आणली आहे. गोकुळ देखील ताब्यात द्या. ती संस्था देखील चांगली चालवून दाखवू, असे सांगतच ना. मुश्रीफ यांनी गोकुळ मध्ये सत्ता आली तर धोरणात्मक निर्णय आम्ही नेते मंडळीच घेणार आहोत, असे स्पष्ट केले.महाडिक यांच्या सारखी सत्ता असती तर गोकुळ मध्ये एक टँकर देखील लावला नसता, असा टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी महादेवराव महाडिक यांना लगावला.

हेही वाचा- चंद्रकांत पाटील तुम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल कराच; हसन मुश्रीफ यांचे आव्हान

चेअरमन निवड बाकी

गोकुळ निवडणुकीचा निकाल लागला आहे. फक्त चेअरमन निवड बाकी आहे असे सांगत, गोकुळ मध्ये महविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वास ना. मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

बाप, ताप की पाप

महादेवराव महाडिक यांनी परवा आपण जिल्ह्याचा बाप असल्याचे वक्तव्य केले आहे. ते बाप आहेत, ताप आहेत की पाप, यावर खासदार संजय मंडलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र महाडिक यांनी असे बोलून लोकांचा अपमान केला आहे. असे बोलणे बरे न्हवे असे मुश्रीफ यांनी सांगितले.

Edited By- Archana Banage