esakal | 'दादांची माया कोठे आहे ते मला माहितीय'
sakal

बोलून बातमी शोधा

'दादांची माया कोठे आहे ते मला माहितीय'

'दादांची माया कोठे आहे ते मला माहितीय'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : विरोधी पक्षनेत्यांना (देवेंद्र फडणवीस) सगळीकडे राजकारण दिसत आहे. (devendra fadanvis) त्यांनी डॉक्टर, परिचारिका, महापालिका कर्मचाऱ्यांना नाउमेद करू नये. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना श्रेय द्यायचे नाही तर देऊ नका; पण राजकारण करून नाउमेद करू नका. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांच्याकडून त्यांनी शिकण्यासारखे आहे. मंत्री गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना देऊन प्रसिद्धीसाठी राजकारण करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. मी येणार म्हणून कोणी येत नाही, असाही टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी लगावला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, 'महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. त्यांचे काम चांगले झाले. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी घेऊन मुख्यमंत्र्यांना फोन करून कौतुक केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले. ते काय आभासी आहेत काय? विरोधी पक्षांतील नेत्यांना केवळ राजकारण दिसत आहे; पण डॉक्टर, परिचारिका, पालिका कर्मचारी यांना नाउमेद करू नका, आम्हाला श्रेय द्यायचे नसेल तर देऊ नका; पण नाउमेद करू नका. गेले दीड वर्ष बालपण हरविले आहे. मुलांना शाळेत जाता येत नाही. तरीही राजकारण केले जाते. माझी विनंती आहे, की त्यांनी यंत्रणेला नाउमेद करू नये.'

हेही वाचा: Airtel चा जबरदस्त प्लॅन! 19 रुपयांमध्ये मिळणार 200MB डेटा

माया कोठे आहे हे माहिती आहे

अब्रू नुकसानीबद्दल सांगणाऱ्यांना आठवणीत असेल-नसेल; पण १०० कोटी कोठून आणणार म्हणणाऱ्यांची माया कोठे, हे सर्व मला माहिती आहे. गडहिंग्लजमधील नलवडे कारखान्यावेळी माझ्यावर केलेल्या वक्तव्याबाबत जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर मी केलेल्या वक्तव्यावर माझ्यावर ते अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हणाले होते. मी विनाविलंब करण्याचे आवाहन केले आहे. पण, त्यांनी दावा दाखल केला नाही.