esakal | 35 वर्षाच्या संघर्षाला न्याय मिळेल का? मुश्रीफ यांच्यासमोर मोठे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

 So what are we fighting for ?; Hassan Mushrif

35 वर्षाच्या संघर्षाला न्याय मिळेल का?

sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : यंत्रमाग कामगारांसाठी (Machine spinning workers) स्वतंत्र कल्याणकारी मंडळ ( Welfare Board)येत्या महिन्याभरात स्थापन करण्याची घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Labor Minister Hasan Mushrif)यांनी केली आहे. हा निर्णय यंत्रमाग कामगारांसाठी नक्कीच क्रांतीकारी आहे. आतापर्यंत हा कामगार वर्ग शासनाच्या विविध लाभापासून वंचित राहिला आहे. हे मंडळ अस्तीत्वात आल्यानंतर किमान सुविधा यंत्रमाग कामगारांना मिळणार आहेत. मात्र याबाबतची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात हे मंडळ अस्तीत्वात आणण्याचे मोठे आव्हान मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर असणार आहे.

बांधकाम कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची चर्चा गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. पण मंत्री मुश्रीफ यांनी याबाबतची घोषणा केल्यानंतर हा विषय पून्हा चर्चेत आला आहे. मुळात यंत्रमाग कामगार हा नेहमीच दुर्लक्षीत राहिलेला घटक आहे. शासनाच्या कोणत्याच योजनांचा या घटकाला लाभ मिळालेला नाही. अगदी कोविड काळात विविध घटकांना १५०० रुपयांचे राज्य शासनाकडून अनुदान मिळाले. पण हा घटक मात्र या लाभापासूनही वंचित राहिला आहे.

मुळात यंत्रमाग कामगारांची नोंद कोणत्याच शासकीय अथवा खासगी आस्थापनांकडे नाही. त्यामुळे मंडळाच्या स्थापनेनंतर लाभार्थी म्हणून निकष कसा लावणार हा सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे. या मंडळात केवळ यंत्रमाग कामगार असणार की पूरक उद्योगातीलक कामगारांचा समावेश केला जाणार याबाबतही अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे असे अनेक तांत्रिक मुद्दे मंडळ स्थापन करतांना उपस्थीत होणार आहेत. त्यावर कसा मार्ग काढला जाणार हे महत्वाचे ठरणार आहे. यातील अनेक अडचणी चर्चेतून दूर होवू शकतात.

मंडळासाठी आर्थिक स्त्रोत म्हणून सूत विक्रीवर सेस लावण्याचा शासनाचा सर्वसाधारण विचार दिसत आहे. पण सूत निर्मिती पासून त्याची विविध चार ते पाच टप्प्यावर विक्री होत असते. त्यामुळे सेस कितीदा आकारण्यात येणार याबाबत स्पष्टता असणे महत्वाचे असणार आहे. वास्तविक या निर्णयाचा भार थेट यंत्रमागधारकांवर बसणार आहे. त्यामुळे हे मंडळ स्थापन करण्यास यंत्रमागधारकांची सहमती अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

मुळात या उद्योगात नवीन कामगार येण्यास उत्सुक नाही. पण कल्याणकारी मंडळ स्थापन झाल्यास पुन्हा नविन कामगार या उद्योगात येवू शकतात. जर मंडळ स्थापन झाल्यास केवळ यंत्रमाग कामगारांनाच लाभ दिला जाणार की वस्त्रोद्योगातील सर्वच कामगारांना लाभ मिळणार याबाबतही आतापासूनच उत्सुकता आहे. कागदावर जरी हे मंडळ तयार करण्यास सोपे वाटत असले तरी अनेक अडचणींचा डोंगर समोर असणार आहे. किंबहुना हे मोठे आव्हानच असणार आहे. हे आव्हान कामगार मंत्री मुश्रीफ पेलणार काय, याकडे लक्ष लागले आहे. बांधकाम कामगारांसाठी त्यांनीच कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. त्याच धर्तीवर हा प्रलंबीत प्रश्न ते मार्गी लावतील अशी आशा यंत्रमाग कामगारांना आहे.

किमान सुविधा मिळणार

मंडळाच्या स्थापनेनंतर यंत्रमाग कामगारांना किमान सुविधा मिळू शकतात. यामध्ये विविध प्रकारचा कौटुंबिक लाभ प्राधान्यांने मिळू शकतो. या शिवाय पाल्यांना शैक्षणिक मदत, आरोग्यासाठी निधी आदी अतिरिक्त सुविधा मिळू शकतात. त्यामुळे त्यांच्या जिवनात किमान सुरक्षीतता असल्याची भावना निर्माण होणार आहे.

हेही वाचा- कोल्हापूर : राहुल रेखावार नवे जिल्हाधिकारी; दौलत देसाईंची बदली

राज्यातील प्रमुख तीन केंद्रातील यंत्रमाग संख्या

इचलकरंजी - ८५ हजार

मालेगाव - २ लाख

भिवंडी - ४ लाख ५० हजार

निव्वळ यंत्रमाग कामगार - १ लाख ७५ हजार,

कांडीवाले, जाॅबर, दिवाणजी आदी - १ लाख

कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी गेली ३५ वर्षे कामगारांचा संघर्ष सुरु आहे. पण मंत्री मुश्रीफ यांच्या घोषणेमुळे मोठी आशा निर्माण झाली आहे. यासाठी यंत्रमागधारक सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. प्रसंगी यासाठी संघर्ष करण्याचीही तयारी आहे.

भरमा कांबळे - लालबावटा कामगार युनियन,इचलकरंजी

loading image