
Warkari Sampraday : अबू आझमी यांना वारी, वारकरी संप्रदायाबद्दल माहिती नाही असे दिसते. त्यातून त्यांनी हे विधान केले असावे. नमाज हा दिवसातून पाचवेळा असतो, तर वारी वर्षातून एकदा असते. वारीचा मार्गही ठरलेला असतो. अबू आझमी भेटले की त्यांना वारी म्हणजे काय हे समजावून सांगतो, असे प्रत्युत्तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. वारीमुळे वाहतुकीला अडथळा होतो, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले होते. त्यावरून बराच वादंग उठला होता.