esakal | ''गोकुळ हाती दिल्यास माता-भगिनींना सोन्या-नाण्याने मडवू"

बोलून बातमी शोधा

null
''गोकुळ हाती दिल्यास माता-भगिनींना सोन्या-नाण्याने मडवू"
sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघात परिवर्तन महत्वाचे आहे. मतदारांनी गोकुळ मध्ये एकदा परिवर्तन करावे. गोकुळचा पैसा शेतकऱ्यांकडे गेला पाहिजे. तो अन्य मार्गाने दुसरीकडे जात आहे. हा पैसा शेतकऱ्यांकडेच गेला पाहिजे. आम्ही राजकारण करण्यासाठी गोकुळमध्ये जात नाही किंवा गोकुळचा राजकीय अड्डा करण्यासाठी जाणार नाही. त्यासाठी वेगळी माध्यम आहेत. पण, एकदा मतदारांनी आणि आमच्या माता-भगिनींना एकहाती सत्ता देण्यासाठी कपबशीवर शिक्का मारून प्रचंड मतानी विजयी करावे. त्यानंतर आमच्या माता भगिनींना सोन्या-नाण्याने मडवून टाकू असा विश्‍वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केला. कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, गोकुळमध्ये परिवर्तन करुन विरोधी आघाडीला संधी देतील. ही संधी दिल्यानंतर गोकुळमध्ये नेमके काय चालले आहे. हे कळणार आहे. शेतकऱ्यांचा पैशा शेतकऱ्यांकडे राहिल याकडे लक्ष दिले जाईल. तो इतरत्र जाणार नाही. याची खात्रीही देतो. त्यामुळे मतदारांनीच गोकुळमध्ये परिवर्तन करायचे ठरवले असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

हेही वाचा- खोटारडे धनंजय महाडिक ईस्ट इंडिया कंपनीसारखे आले कोल्हापुरात; सतेज पाटलांचा विरोधकांवर घणाघात

राजू शेट्टींची भूमिका अनाकलनीय  

काल माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्तारूढ पॅनेलला दिलेला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सत्तारुढ गटाला दिला पाठिंबा अनाकलनीय आहे. याव्यतिरिक्त आपण काय बोलणार असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

अशोक चराटींवर राजकीय दबाव  

अशोक चराटी यांच्यावर स्थानिक राजकारणातून दबाव आणला आहे. त्यामुळे त्यांनी सत्तारूढ गटाकडे गेले आहे. तरीही, आपल्याला विश्‍वास आहे की त्यांनी पहिल्यांदा जी भूमिका आमच्यासोबत घेतली तीच भूमिका या निवडणूकीत घेतली, असेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. 

वाढीव 600 मतांनी आमचा विजय झाला असे सत्तारुढांनीच जाहीर केले

गोकुळमध्ये सत्तारुढने 400 ठराव वाढवले आहेत. पण आमच्यासोबत विद्यमान चार संचालक आहे. याशिवाय, राष्ट्रवादीचे मतदारही यामध्ये आहे. 1000 मतदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे सत्तारूढकडे 400 असतील तर 600 मतांनी आमच्या विरोधी पॅनेलचा विजय झाला हे सत्तारुढ गटाच्या लोकांनीच जाहीर केले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

क्रॉस ओटिंग होणार नाही  

क्रॉस वोटिंगचा धोका होता. पण कोणी काहीही सांगितले तरीही राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या कपबशी या चिन्हावर प्रत्येकजण शिक्का मारुन प्रचंड मतांनी विजयी करतील. कोणही क्रॉस ओटिंग करणार नाही. असाही विश्‍वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Edited By- Archana Banage