esakal | खोटारडे धनंजय महाडिक ईस्ट इंडिया कंपनीसारखे आले कोल्हापुरात; सतेज पाटलांचा विरोधकांवर घणाघात

बोलून बातमी शोधा

खोटारडे धनंजय महाडिक ईस्ट इंडिया कंपनीसारखे आले कोल्हापुरात; सतेज पाटलांचा विरोधकांवर घणाघात
खोटारडे धनंजय महाडिक ईस्ट इंडिया कंपनीसारखे आले कोल्हापुरात; सतेज पाटलांचा विरोधकांवर घणाघात
sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासारखं खोट बोलणारा माणूस या राजकारणात सापडणार नाही. 2017 मध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात याच धनंजय महाडिक यांनी सांगितले होते की गोकुळमध्ये महाडिकांचा एकही टॅंकर नाही. आता गोकुळ निवडणूकीच्या प्रचारात त्यांचेच चुलते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी "गोकुळमध्ये माझे 40 टॅंकर आहेत' असल्याचे जाहीर केले आहेत. त्यामुळे या महाडिकांचा खोटा चेहरा जनतेसमोर आला असल्याची टिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, धनजंय महाडिक किती खोटे बोलतात. याची भाषणे आहेत. वृत्तपत्रामध्येही मोठे हेडिंगने बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. हा धडधडीत पुरावा आहे. दरम्यान, महादेवराव महाडिक यांनी आपले 40 टॅंकर गोकुळमध्ये असल्याचे जाहीर केले आहे. आता धनंजय महाडिक यांना उलट प्रश्‍न केला पाहिजे. 2017 मध्ये धनंजय महाडिक म्हणाले होते गोकुळमध्ये आमचा एकही टॅंकर नाही. त्यावेळी प्रसिध्द झालेली वृत्त आणि आता महादेवराव महाडिक यांनी "गोकुळमध्ये माझे 40 टॅंकर आहेत' अशा मान्य केलेली वृत्त एकत्रित वापरून त्यांचा खोटा चेहरा प्रसार माध्यमांनी जगा समोर आणला पाहिजे. एक वर्षापूर्वी 2 लाख 70 हजार मतांनी हा खोटा चेहरा जगा समोर आलाच असल्याची टिका श्री पाटील यांनी केली.

हेही वाचा- कोल्हापुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस: शहरवासीय झाले चिंब

दोन नंबरवाल्यांनी आमची अभद्र युती म्हणून बोट दाखवण्याची गरज नाही. लोकांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही स्वत:चे टॅंकर वाचवण्यासाठी येथे आलेलो नाही. महाडिक टॅंकर वाचवण्यासाठी आलेले आहेत. वास्तविक महाडिक कंपनीही ईस्ट इंडिया कंपनीसारखी कोल्हापूरमध्ये आली आहे. त्यांनी एक-एक संस्था ताब्यात घेण्याचे काम केले. मात्र कोल्हापूरची जागृक आणि स्वाभिमानी जनता आपले कोण आणि परके कोण याचा फरक त्यांना कळतो. 5 लाख 50 हजार लोकांच्या दूध उत्पादकांच्या जीवावर एकच माणूस मोठा झाला आहे. त्या साडे पाच लाख लोकांनी दूध काढला, शेण-घाण काढली आणि घर मात्र एकाच माणसाचे भरले आहे. आता हे साडेपाच लोक जागृक झाले आहेत. आत हे लोक महाडिक यांना मतदान नाही म्हणून सांगत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Edited By- Archana Banage