"बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठा तयार केल्या जात आहेत. जिल्ह्यात २७ हजार ३०० महिला बचत गट आहेत. १२३० ग्रामसंघ, ६७ प्रभाग संघ आहेत."
कोल्हापूर : देशात पन्नास टक्के महिला आहेत. त्यांना नोकरी, राजकारण, समाजकारणासह इतर कामांत तेवढाच सहभाग, सन्मान दिला पाहिजे. महिलांना समानतेचा दर्जा दिला, असे अमेरिकासारखे देश पुढारलेले आहेत. त्यामुळे भविष्यात महिलांचा समाज प्रवाहात सहभाग वाढवला पाहिजे, यासाठी शासन कार्यरत राहील, असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केले.