सहा काय १० आमदार निवडून आणा; हसन मुश्रीफांचे संजय मंडलिकांना उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur
सहा काय १० आमदार निवडून आणा; हसन मुश्रीफांचे संजय मंडलिकांना उत्तर

सहा काय १० आमदार निवडून आणा; हसन मुश्रीफांचे संजय मंडलिकांना उत्तर

कोल्‍हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत(upcoming vidhansabha election) शिवसेनेचा सहा आमदार निवडून आणू, अशी घोषणा खासदार संजय मंडलिक(mp sanjay mandlik) यांनी केली होती. त्यांच्या या वक्‍तव्याचा आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी चांगलाच समाचार घेतला. जिल्‍ह्यात सहा नाही तर १० आमदार आहेत. मग सहाच आमदार कशाला, १० आमदार निवडून आणा, असा टोला त्यांनी खासदार मंडलिक यांना लगावला. त्यांनी जे आमचं नवीन ठरलंय, असे वक्‍तव्य केले आहे, त्याबाबतही काय ठरलंय, ठरवणार आहेत ते आता जनताच ठरवणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा: सोलापूर : सिद्धरामेश्‍वर यात्रेला प्रशासनाची केवळ शंभरजणांना परवानगी

जिल्‍हा बँकेच्या निवडणुकीपासून खासदार संजय मंडलिक मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात सातत्याने कलगीतुरा सुरू आहे. दररोज नवनवीन वक्‍तव्ये केली जात असल्याने ऐन थंडीतही राजकीय वातावरण गरम झाले आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी खासदार मंडलिक यांनी दोन्‍ही मंत्र्यांना उद्देशून अदानी, अंबानीचा उल्‍लेख केला. जिल्‍ह्याच्या आणि बँकेच्या राजकारणात शिवसेना निर्णायक भूमिकेत राहील, नेत्यांची मक्‍तेदारी चालू देणार नाही, असा इशाराही मंडलिक यांनी दिला होता. शिवसेनेच्या नूतन संचालकांच्या सत्‍कारावेळी जिल्‍ह्यात आमचं नवीन ठरलंय, अशी घोषणा देत सर्व स्‍थानिक स्वराज्य संस्‍था निवडणुकीत शिवसेना ताकद दाखवेल तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्‍ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून येतील, असेही वक्‍तव्य केले होते. या वक्‍तव्याचा समाचार आज मुश्रीफ यांनी घेतला. जिल्‍हा परिषद आवारातील चंदगड भवनच्या उद्‍घाटनानंतर ते बोलत होते.

हेही वाचा: कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्याचा आंदोलनस्थळी मृत्यू

लोक कोरोनाचे प्रोटोकॉल पाळत नाहीत

चंदगड भवनच्या उद्‍घाटनासाठी मोठ्या प्रमाणात लोक आले होते. त्यामुळे सोशल डिस्‍टन्‍सचा फज्‍जा उडाला. पालकमंत्री सतेज पाटील यांनी वारंवार मास्‍क वापरण्याचे व सोशल डिस्‍टन्‍स ठेवण्याचे आवाहन केले. यावर मंत्री मुश्रीफ म्‍हणाले, ‘‘कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे दक्षता घेणे आवश्यक आहे. या कार्यक्रमावेळीही ५० लोकांनाचा उपस्‍थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र लोकांनी गर्दी केल्याने कोरोना प्रोटोकॉलचे पालन होताना अडचणी आल्या आहेत. आयोजकांनी असे कार्यक्रम करताना कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे.’’

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top