
Bhaiyya Mane Kolhapur : पुणे पदवीधर विधान परिषद निवडणुकीला अजून दीड वर्षाचा अवधी असला तरी आतापासूनच या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळावी, यासाठी राज्य पातळीवर प्रयत्न सुरू असून, जागा मिळाली तर उमेदवारी कोल्हापूरला मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे उजवे हात समजले जाणारे जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी शड्डू ठोकला आहे.