
चिमुरडीवर अत्याचार, आरोपीला मरेपर्यंत तिहेरी जन्मठेपेची शिक्षा
कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील खोची इथल्या सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करणाऱ्या नराधम प्रदीप उर्फ बंडा पोवार याला आज प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी काम पाहिलं आहे. या खटल्यात त्यांनी एकूण 28 साक्षीदार तपासले गेले आहेत.
दरम्यान, आज या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खोची परिसरातील ग्रामस्थांनी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. तसेच वेगवेगळ्या कलमाखाली दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावेळी आरोपीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आरोपीला पोलिस बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या दालनाबाहेर मोठी गर्दी झाली होती.
हेही वाचा: 'देवाची चर्चा सोडा, लोकशाहीच्या मंदिरातील ह्या देवाचा श्वास कोंडलाय'
दरम्यान, २७ एप्रिलाल या खटल्या संदर्भात विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांनी दिलेली माहिती अशी, संबंधित गावात एका झाडाखाली ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी एका सहावर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून केल्याचा प्रकार उघडीस आला. घटनेपूर्वी आरोपी बंडा ऊर्फ प्रदीप पीडितेच्या घरी गेला होता. त्याने पीडितेचे घरातून अपहरण केले. दृष्ट हेतूने तो जागेची रेकी करण्यासाठी पीडितेसोबत सकाळी अकरा ते दुपारी साडेबाराच्या सुमारास टेहाळणी करत होता. त्याला पीडितेसोबत चौघा साक्षीदारांनी पाहिले होते. त्यानंतर काही वेळाने तो कावराबावरा होऊन जातानाही साक्षीदाराने पाहिले. दुपारी पाऊणच्या सुमारास तो घरी येऊन झोपला. दरम्यान, पीडितेची आई शेतकाम करून घरी आली; मात्र तिला घरात मुलगी दिसली नाही. मुलीचे वडील घरात झोपले होते. त्यांच्याकडे चौकशी केली. ती बाहेर खेळत असेल, असे त्यांनी सांगितले; पण मुलगी मिळून येत नसल्याने तिची शोधाशोध सुरू झाली. शोधकार्यातील तरुणांनी पीडितेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बंडा ऊर्फ प्रदीपला ताब्यात घेतले. चार साक्षीदारांच्या माहिती आधारे त्याला मध्यरात्री अटक केली. घटनास्थळाचा पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी पंचनामा केला. घटनास्थळी केस, माती आणि गुटख्याची पाकिटे मिळून आली होती. ते तपासणीसाठी फोरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले.
Web Title: Hatkanangale Khochi Murder Case Accused Banda Powar Life Imprisonment Triple Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..