Raju Shetty: माझं काय चुकलं? प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का?,राजू शेट्टीची भावनिक पोस्ट

Hatkanangale loksabha 2024 Election Result: सत्यजित पाटील यांची उमेदवारी मात्र ऐनवेळी जाहीर झाली होती|
माझं काय चुकलं? प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का?,राजू शेट्टीची भावनिक पोस्ट
Raju Shetty Hatkanangale loksabha result sakal

Islampur: हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि काल पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार राजू शेट्टी यांनी त्यांच्या पराभवानंतर "माझं काय चुकलं? प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही..." असा भावनिक सवाल उपस्थित केला आहे. फेसबुकवर त्यांनी आज सकाळी ही पोस्ट शेयर केली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. माजी खासदार निवेदिता माने आणि कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा पराभव करत ते खासदार बनले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी यांना जवळ करत आघाडीतून निवडणूक लढवली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसल्याच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.त्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी यावेळी मात्र स्वतःच्या ताकदीवर ही निवडणूक लढवली होती. यावेळच्या निवडणुकीत अनपेक्षितरित्या ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना फक्त १ लाख ७९ हजार ८५० इतकी मते मिळाली.

विद्यमान खासदार धैर्यशील माने, शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यातील या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. धैर्यशील माने यांच्यासाठी राज्य पातळीवरून मोठी यंत्रणा कामाला लागली होती. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात विशेष लक्ष घातले होते. सत्यजित पाटील यांची उमेदवारी मात्र ऐनवेळी जाहीर झाली होती.

या दोन्हींमध्ये राजू शेट्टी यांनी मात्र खूप आधीपासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला सुरुवात केली होती. मागील निवडणुकीत राजकीय पक्षांशी सलगी केल्याचा फटका बसला होता, त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी राजकीय पक्षांकडे ढुंकूनही पाहिले नाही. किंबहुना संधी मिळेल त्याठिकाणी त्यांच्यावर टीकाच केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ते महाविकास आघाडीत सहभागी होतील, अशीही शक्यता वर्तवली जात असताना त्यांनी ते धुडकावून लागले आणि 'एकला चलो रे' ची भूमिका घेत त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा 'महायुती'ला विरोध होता तर त्यांनी किमान महाविकास आघाडीला बाहेरून का होईना पाठिंब्याची भूमिका घेतली असती तर चित्र वेगळे असते.

माझं काय चुकलं? प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का?,राजू शेट्टीची भावनिक पोस्ट
Loksabha Election Result : मुसळधार पावसात भाजपचा जल्लोष ; ‘काय म्हणतात पुणेकर, निवडून आले मुरलीधर’

सत्यजित पाटील यांची अगदी ऐनवेळी झालेली 'एन्ट्री' थांबली असती आणि दोघांमध्ये लढत झाली असती आणि शेट्टी यांना नक्कीच त्याचा फायदा झाला असता, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या लढाईत दोन धनाढ्य आणि बलाढ्य उमेदवारांच्या समोर राजू शेट्टी एकाकी पडले, असेच चित्र आहे.

शेतकरी हा राजू शेट्टी यांच्या भरवशाचा भक्कम आधार होता. आतापर्यंत शेतकरीकेंद्रित केलेल्या कामावर शेतकरी त्यांना साथ देतील या आशेवर त्यांनी तिसऱ्यांदा स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांकडून त्यांना अपेक्षा होत्या. आमदार बच्चू कडू यांनीही त्यांना साथ देण्याचा प्रयत्न केला.

माझं काय चुकलं? प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का?,राजू शेट्टीची भावनिक पोस्ट
Pune Loksabha : कसबा, कोथरूड रंगले विजयाच्या गुलालात

याव्यतिरिक्त त्यांच्याकडे स्टार प्रचारक नव्हते. फार आधीपासून प्रचाराला सुरुवात केल्याने त्यांनी मतदारसंघातील गावागावात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. सामान्य मतदार, शेतकरी यांच्या बळावर त्यांनी नशीब आजमावून पाहिले; परंतु त्यांना अपेक्षित पल्ला गाठता आला नाही. त्यामुळे त्यांनी "शेतकऱ्यांनो तुम्हीही...?" असा भावनिक सवाल उपस्थित केला आहे...

विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते

राजू शेट्टी यांना एकूण १ लाख ७९ हजार ८५० इतकी मते मिळाली. हातकणंगले मतदारसंघात विधानसभा मतदारसंघ निहाय पडलेली मते - इस्लामपूर ३८ हजार ८०६, शिराळा - १७ हजार ४९९, शाहूवाडी - १४ हजार ५७४, हातकणंगले - ३५ हजार ७०६, इचलकरंजी - १० हजार ४९५, शिरोळ - ६१ हजार ७८६.

माझं काय चुकलं? प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का?,राजू शेट्टीची भावनिक पोस्ट
Loksabha Election Result : टायगर अभी जिंदा है!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com