Hatkanangale train accident
esakal
हातकणंगले : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या युवतीचा रेल्वेच्या धडकेत काल दुपारी बाराच्या सुमारास मृत्यू झाला. अनुष्का संतोष पोवार (वय १७, रा. वेताळपेठ, गल्ली क्रमांक ३, इचलकरंजी) असे मृत तरुणीचे नाव आहे. हातकणंगले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर ही धक्कादायक घटना घडली. हातकणंगले पोलिस ठाण्यात नोंद झाली (Dhanbad Express Accident News) आहे.