

Political activity intensifies in Hatkanangle taluka as reservation reshapes the Zilla Parishad election battlefield.
sakal
हातकणंगले : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे हातकणंगले तालुक्यातील इच्छुकांच्या तयारीला वेग आला आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेचे अकरा गट असून, रेंदाळ खुला, तर कोरोची व कुंभोज महिलांसाठी खुला झाल्याने या तीन ठिकाणी चुरशीच्या लढती रंगणार आहेत. जिल्हा परिषदेचे ६ अनुसूचित, २ नागरिकांचा मागास प्रवर्ग असे ८ मतदारसंघ आरक्षित झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक आठ मतदार संघ आरक्षित झाल्याने अनेक दिग्गजांनी तलवारी म्यान केल्या आहेत.
- अतुल मंडपे