मंत्री आबिटकर म्हणाले, "मुलींचे कमी प्रमाण चिंताजनक आहे. त्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे गरजेचे आहे."
कोल्हापूर : ‘गर्भलिंग करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने गंभीर पावले उचलली आहेत. असे प्रकार करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या खबऱ्याला एक लाखाचे बक्षीस दिले जाईल. तसेच अशा प्रकरणांमध्ये धाडसाने पुढे येणाऱ्या पीडित महिलेलाही एक लाख रुपये दिले जातील’, असे आरोग्यमंत्री पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी येथे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना जाहीर केले.