मंत्री आबिटकर म्हणाले, ‘प्रामुख्याने हे रुग्ण आढळलेल्या भागातील पाण्यांचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी. आजारातील बहुतांश रुग्ण बरे होत असून, थोड्या रुग्णांना व्हेंटिलेटरची (Ventilator) आवश्यकता पडत आहे.
कोल्हापूर : गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ (GBS Disease) पसरलेल्या भागातील या आजारामागची कारणे शोधण्यासह पाणीपुरवठा स्त्रोतांची, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी व शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी करा, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तत्काळ रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवाहन तसेच जनजागृती करणे, आदी सर्वंकष उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Health Minister Prakash Abitkar) यांनी दिले.