
-शिवाजी यादव
कोल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थी रुग्ण संख्या वाढत आहे. त्यासोबत कामाचा ताण वाढला तरी आरोग्यमित्र काम करीत आहेत. असे असूनही आरोग्य मित्रांना किमान वेतन व रोजगाराची शाश्वती देण्यात राज्य शासन व ठेकेदार कंपन्याकडून कंजुशी होत आहे. परिणामी राज्यातील दीड हजारावर आरोग्य मित्र निराशेच्या गर्तेत सापडले आहेत.